आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ती परत आलीये':भूमिकेबद्दल कुंजिका काळवींट सांगते - 'रातांधळी सायलीची भूमिका साकारणे आव्हानात्मक'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सायलीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत

'ती परत आलीये' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला या मालिकेने आपल्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. झी मराठीवरील ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला आणि या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला पसंती दर्शवली. त्यातील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे सायलीची. ही भूमिका निभावणारी अभिनेत्री कुंजिका काळवींट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. तिच्या या भूमिकेविषयी आणि मालिकेबद्दल तिच्या सोबत साधलेला हा खास संवाद

तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? आणि या मालिकेसाठी जेव्हा तुला विचारण्यात आलं तेव्हा तुझी प्रतिक्रिया कशी होती?
ती परत आलीये ही नऊ मित्रांची गोष्ट आहे आणि त्यात सायली नावाचं कॅरेक्टर मी करतेय. या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा नाही म्हणायचं प्रश्नच नव्हता. कारण याआधी मी केलेल्या भूमिकांपेक्षा ही वेगळी भूमिका होती. त्यात सायलीची व्यतिरेखा ही खूप मृदू आहे. तिला सगळ्यांबद्दल काळजी आहे. संपूर्ण ग्रुप मध्ये ती एकमेव अशी आहे जिला सगळ्यांसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. प्रत्येक परिस्थितीत ती सगळ्यांचा विचार करत असते.

सायली साकारणं किती आव्हानात्मक आहे?
सायली ही रातांधळी आहे हे तिला सगळ्यांपासून लपवायचा असतं पण ते आता सगळ्यांसमोर आलं आहे. त्यामुळे मला सायली साकारणं खूप चॅलेंजिंग वाटतं. या भूमिकेचा अभ्यास करताना मी काही चित्रपट बघितले होते आणि काही लोकांकडून याबद्दल जाणून घेतलं. त्यामुळे सायली साकारणं जरी आव्हानात्मक असलं तरी ती साकारताना मजा येतेय.

हॉरर मालिकेसाठी शूटिंग करताना तुमची ऑफस्क्रीन काय भावना असते?
आम्ही ज्या भागात शूटिंग करतोय आणि जिथे राहतोय तिथे आजूबाजूला खरंच खूप जंगल आहे आणि फारशी वस्ती नाही आहे. गावात खूप आतल्या बाजूला हे रिसॉर्ट आहे आणि आमचं शूटिंग हे बहुतेक वेळेस रात्रीच असतं त्यामुळे अनेकदा आम्हालाच घाबरायला होतं. मालिकेत वापरलेलं मास्क खूप हॉरिबल आहे. हॉटेलच्या काचेवर सावली जरी दिसली तरी आम्ही घाबरतो. पण हळूहळू आता हे सगळं सवयीचं होतंय.

तुझ्या या भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय?
सायलीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया माझ्या पर्यंत पोहोचत असतात. प्रेक्षक हे खूप सुज्ञ आहेत त्यामुळे त्यांनाही एक कलाकार म्हणून माझ्यातील बदल जाणवतो. यामुळे माझाही कामाचा उत्साह वाढतो.

तुम्ही अनेक कलाकार एकत्र शूटिंग करता, तुमचं ऑफस्क्रीन बाँडिंग कसं आहे?
आमची सेटवर प्रचंड धमाल सुरु असते. आमचे सगळ्यांचे सीनही बऱ्याचदा एकत्र असतात. आम्ही नऊजण जवळपास एकाच वयाचे असल्यामुळे सीनमध्ये आमची धमाल सुरु असते. केवळ धमाल मस्तीच नाही तर आम्ही आमचे अनुभव देखील एकमेकांसोबत शेअर करत असतो. समीर खांडेकर, वैभवमुळे सेटवर धमाल चालूच असते. आम्ही मुंबई बाहेर शूटिंग करत असल्यामुळे आम्ही सगळेच सतत एकत्र असतो आम्ही एकमेकांना सीनमध्येही खूप मदत करतो.

बातम्या आणखी आहेत...