आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी सिनेसृष्टीतील अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे दगडू आणि प्राजू. प्रेक्षकांनी ‘टाइमपास 1’ आणि ‘टाइमपास 2’ मधील दगडू आणि प्राजूच्या अनेख्या लव्हस्टोरीला प्रचंड उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेल्या 'टाइमपास 3' नेही प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या 'टाईमपास 3' ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या 4 दिवसांमध्ये 4.36 करोडची कमाई करून फुल्ल धुमाकूळ घातला आहे.
अजूनही बॉक्स ऑफिसवर ‘टाइमपास 3'ची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सध्या पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी चित्रपटाविषयी म्हणतात, "अवघ्या 4 दिवसांमध्ये 4.36 करोडची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सध्या हिंदी सिनेमाचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव बघता दगडू आणि पालवीच्या प्रेमाला प्रेक्षकांचा इतक्या कमी दिवसांत इतका उत्साहजनक प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो. चित्रपट चांगला असल्यावर प्रेक्षकसुद्धा तो चित्रपट डोक्यावर घेतात, तसाच हा चित्रपट आहे. ज्याला सध्या प्रेक्षकांच्या उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'टाईमपास 1' आणि 'टाईमपास 2' ला जितका प्रतिसाद मिळाला तितकाच प्रतिसाद प्रेक्षक 'टाईमपास 3'ला ही देत आहेत. चित्रपट पाहून समीक्षक आणि प्रेक्षकांच्या देखील सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत."
'टाइमपास 3' या चित्रपटात हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. 'टाइमपास 3' या चित्रपटात कुमारवयातल्या दगडू आणि पालवीचा आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सने या चित्रपटाच्या निर्मिती केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.