आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे अभिनय:लक्ष्मीकांत बेर्डेंचे निधन झाले तेव्हा अवघ्या सात वर्षांचा होता अभिनय, आई प्रिया म्हणते -माझी दोन्ही मुले समंजस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वानंदी अभिनयची धाकटी बहीण आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मोठा मुलगा अभिनयने आईवडिलांच्या पावलावर पाऊल चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले आहे. त्याचा पहिलाच चित्रपट 'ती सध्या काय करते' हा बॉक्स ऑफिसवर गाजला. आज अभिनयचा वाढदिवस असून तो 23 वर्षांचा झाला आहे. अभिनयला एक धाकटी बहीणसुद्धा आहे. स्वानंदी हे तिचे नाव असून ती 19 वर्षांची आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय 7 वर्षांचा तर स्वानंदी फक्त 4 वर्षांची होती. त्यांच्या पश्च्यात अभिनय स्वानंदीसाठी वडिलांची भूमिका निभावतोय.

  • प्रिया बेर्डे म्हणतात, माझी मुले समंजस

अभिनय आपल्या बहिणीची अगदी मोठ्या भावाप्रमाणे सतत काळजी घेत असतो. प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या या दोन मुलांविषयी सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, ''अभिनय आपल्या बहिणीची एखाद्या समंजस आणि थोरल्या भावासारखीच काळजी घेत असतो. विशेष म्हणजे स्वानंदीही त्याची काळजी घेते. दोघांचं आता एकमेकांशी असलेलं 'बाँडिंग' इतकं जबरदस्त आहे, की कधी कधी मलाही थक्क व्हायला होतं. या दोघांसारखी समंजस मुलं असल्यामुळे मी स्वत:लाच खूप भाग्यवान समजते.''

  • 15 भावांची एकुलती एक बहीण आहे स्वानंदी

स्वानंदी अभिनयची धाकटी बहीण आहे. विशेष म्हणजे बेर्डे कुटुंबातील ती एकुलती एक मुलगी आहे. बेर्डे कुटुंबात आम्हा 15 चुलत भावंडांची ती लाडकी आणि एकुलती एक बहीण आहे. त्यामुळे घरात सगळ्यांची ती लाडकी असल्याचे अभिनय सांगतो. तो म्हणतो, "स्वानंदी घरात लहान आहे. त्यामुळे ती आमच्या सगळ्यांची अतिशय लाडकी आहे. हवं ते करण्याची मुभा तिला आमच्याकडून देण्यात आली आहे. ती तिला हवे ते एक्सपिरिमेंट्स करु शकते. ती अतिशय महत्त्वकांक्षी आहे. आयुष्यात खूप काही करायची तिची इच्छा आहे. तिला जग फिरायचंय आहे. आयुष्यात जे काही ठरवले ते ती 100 टक्के पूर्ण करणार ही मला आशा आहे. मी कदाचित एखाद्या गोष्टीत अडकून पडू शकतो, पण ती स्वतःला कधीच एका चौकटीत बांधू ठेवणार नाही."

  • स्वानंदीच्या कायम पाठिशी उभा असतो अभिनय

अभिनय पुढे म्हणतो, "स्वानंदीला जेव्हा माझी गरज असते, तेव्हा मी तिच्या पाठिशी उभा असतो. सोशली कसं राहावं हे मी तिला सांगत असतो. माझं कॉलेज पूर्ण झालंय, त्यामुळे कॉलेजमधील अनुभव मी तिच्यासोबत शेअर करत असतो. कॉलेजमध्ये कसं राहावं, लोकांमध्ये कसं वागावं, या सगळ्यांची शिकवण माझ्याकडून तिला मिळत असते."