आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेक्षकांसाठी ट्रीट:मनोबल वाढवणारा 'तू चल पुढं' फिल्म फेस्टिव्हल, मनोबल वाढवणारे आणि लढण्याची प्रेरणा देणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 जुन ते 19 जुन रोजी दररोज संध्यकाळी 7 वाजता मनोबल वाढवणारे आणि लढण्याची प्रेरणा देणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आणि सकारात्मक राहण्याची गरज आहे. घरात बसून राहण्याचा सर्वांनाच कंटाळा आलेला आहे. पण या संकटापासून वाचण्याचा हा एकमेव पर्याय आहे. 24 तास घरात बसल्यामुळे सर्वजण कंटाळले आहेत, वैतागले आहेत. या कठीण काळात झी टॉकीज प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या प्रेक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी झी टॉकीजवर ‘तू चाल पुढं’ फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. 15 जुन ते 19 जुन रोजी दररोज संध्यकाळी 7 वाजता मनोबल वाढवणारे आणि लढण्याची प्रेरणा देणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

या फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली आहे ‘पळशीची पेटी’ या प्रेरणादायी चित्रपटाने. एका मेंढपाळाची मुलगी धावपटू बनण्यासाठी कशी धडपड करते हे या चित्रपटातून आपल्या सर्वांना बघायला मिळाले आहे. एक वयोवृद्ध माणूस तृतीयपंथी लोकांना जीवन जगण्यासाठी कसं प्रेरित करतो, लोकांची विचारसरणी बदलण्यात ते यशस्वी होतात का हे ‘जयजयकार’मध्ये 16 जून रोजी पाहायला मिळाले. तीन मुली, ज्या झुंज देत आहेत आपल्याच वडिलांविरोधात, ज्यांना वंशाचा दिवा म्हणून एक अपत्य हवं आहे अशी कथा असलेला ‘मोकळा श्वास’ 17 जूनला प्रसारित झाला. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या कुटुंबाची कथा ‘तानी’मध्ये 18 जून रोजी पाहायला मिळेल.

या फिल्म फेस्टिव्हलची सांगता होणार आहे ‘दे धक्का’ या सुपरहिट चित्रपटाने. नृत्य स्पर्धेत भाग घेतलेल्या सायलीला आणि तिच्या कुटुंबाला आपल्या गावातून मुंबई पर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणी येतात. प्रवासात येणाऱ्या अडचणींवर कशी मात केली जाते हे यात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 19 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता झी टॉकीज वाहिनीवर पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...