आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनच्या काळात:राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीसोबत घडली वाईट घटना, म्हणाला - तरीही या एका गोष्टीचं आहे समाधान

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हार्दिक जोशीने सांगितले, माझा कुत्रा 'बडी' आम्हाला कायमचा सोडून गेला.

लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे प्रेक्षकांचे लाडके कलाकार देखील घरीच आहेत. 'तुझ्यात जीव रंगला'मधील सर्वांचा आवडता राणादा सध्या लॉकडाऊनमध्ये काय करतोय हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद झाल्यापासून हार्दिक बोईसर येथे त्याच्या गावी कुटुंबासोबत राहतोय आणि सध्या मिळालेला वेळ साकारात्मक घालवण्याचा प्रयत्न करतोय.

याबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, "सध्या माझा दिनक्रम सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, घरकामात आईला मदत करणे, घरातल्या अंगणात झाडे लावणे, संध्याकाळी घरच्यांसोबत खेळणे, पुन्हा व्यायाम करणे असा आहे. माझे कुटुंबीय मुंबईत असतात पण मी तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त गेली 4 वर्षे कोल्हापुरात आहे. तीन महिन्यानंतर 2 ते 3 दिवस सुट्टीमध्ये मी मुंबईला घरी यायचो. त्यामुळे 4 वर्षांत घरच्यांना पुरेसा वेळ देता आला नाही. पण आता लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा मी परिवारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतोय.'' 

गेली चार वर्षे मी आईच्या हातचं जेवण मिस करत होतो पण आता मी आईच्या हातच्या पोळी भाजीचा पुरेपूर आस्वाद घेतोय. गेले 2 महिने शूटिंग बंद असलं तरीपण मी मिळालेल्या वेळात सिनेमे आणि वेब सिरीज बघतोय. कलाकार म्हणून त्यातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करतोय.

या दरम्यान घडलेली एक वाईट घटना म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा कुत्रा 'बडी' आम्हाला कायमचा सोडून गेला. माझ्यासाठी बडी म्हणजे माझं बाळ होतं. त्याच्या जाण्याचं दुःख असलं तरी देखील त्याच्या शेवटच्या दिवसात त्याच्यासोबत चांगला वेळ घालवता आला याचं समाधान आहे." 

बातम्या आणखी आहेत...