आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनातली खदखद:सुरुवातीला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रतिक्षाला जाधवला झाला होता घरातून विरोध, म्हणाली...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतिक्षाचा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे.

मंजुळा ही भूमिका साकारल्यानंतर घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रतिक्षा जाधव आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझं माझं जमतंय'मध्ये पम्मीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. नुकतीच या मालिकेत प्रतिक्षाची एंट्री झाली. तिच्या या नवीन भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.

टेलिव्हिजन हे माध्यम प्रतिक्षाला खूप आवडतं कारण या माध्यमातून रोज कलाकारांना आपल्या प्रेक्षक-चाहत्यांना भेटता येतं. पम्मी या लोकप्रिय व्यक्तिरेखेला एका उंचीवर नेऊन ठेवल्यानंतर ती भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे असं प्रतिक्षाला म्हणते आणि त्यासाठी ती खूप मेहनत देखील करतेय. बॉलिवूडमधील करीना कपूर आणि राणी मुखर्जी या अभिनेत्रींनकडून तिला पम्मी साकारण्यासाठी प्रेरणा मिळते.

प्रतिक्षाचा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे पण एकंदरीतच अभिनय क्षेत्रातील सुरक्षिततेबद्दल बोलताना ती म्हणाली, "ग्लॅमर इंडस्ट्रीतील झगमगाट जसा सगळ्यांना दिसतो तसंच या क्षेत्रातील घटना देखील लगेच चव्हाट्यावर येतात, त्यांचा गवगवा होतो म्हणून या क्षेत्राला नावं ठेवली जातात. खरं तर प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात काही घटना घडत असतातच. तुम्ही स्वतःला कसं सादर करता, कोणत्या वर्तुळात वावरता, आणि तुमच्या मतांवर किती ठाम राहता यावर सगळं अवलंबून असतं. सुरुवातीला या क्षेत्रात येण्यासाठी मला देखील घरून विरोध झाला होता; मात्र आता पाठिंबा मिळतोय," असे प्रतिक्षाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...