आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज रंगणार यश-नेहाचा मेंदीचा कार्यक्रम:नेहाच्या मेंदीमध्ये येणार आहेत खास पाहुणे..., असा रंगणार आहे मेंदी स्पेशल एपिसोड

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षकांना हा भाग लवकरच बघायला मिळणार आहे.

नेहा आणि यशाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र चालू आहे. नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा पार पडला. नेहा आणि यशाच्या लग्नसोहळ्याचा थाट काही वेगळाच आहे. या सोहळ्याच्या आधी सगळे कार्यक्रम देखील अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहेत.

आता प्रेक्षक मालिकेत पाहू शकतील की साखरपुड्या नंतर यशचे मित्र बॅचलर पार्टी करायचं ठरवतात. शेफालीला याची खबर मिळते. ती समीरवर नजर ठेवण्यासाठी नेहाला तिथे घेऊन जाते. पण काही गैरसमजामुळे यश मुलींच्या गराड्यात अडकलेला नेहा पाहाते आणि रुसून निघून जाते.

रुसलेल्या नेहाचा राग घालवण्यासाठी काही खास पाहुणे मेंदीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आता हे पाहुणे नक्की कोण आहेत हे प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...