आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरसंक्रांत स्पेशल एपिसोड:सिड-अदितीची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत अगदी पारंपरिक, लनानंतरच्या पहिल्याच मकरसंक्रांतीला कृष्णासमोर हे आव्हान!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच प्रेक्षकांना मकरसंक्रात स्पेशल भाग बघायला मिळणार आहेत.

छोट्या पडद्यावरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' आणि 'मन झालं बाजींद' या मालिकांमध्ये लवकरच प्रेक्षकांना मकरसंक्रात स्पेशल भाग बघायला मिळणार आहेत.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतून प्रेक्षकांना एकत्र कुटुंब पद्धती आणि जिव्हाळ्याच्या नात्यांचं दर्शन घडतं त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की सिड आणि अदितीचं लग्न झालं. देशमुख कुटुंब कुठलाही सण हा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करतो.

सिड आणि अदितीची ही लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत देशमुखांच्या घरात अगदी उत्साहात साजरी होणार आहे. अदिती हलव्याचे दानिगे घालून नटणार असून तिच्या सोबत देशमुख घरातील सगळे कुटुंबीय अगदी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करताना दिसतील.

लनानंतरच्या पहिल्याच मकरसंक्रांतीला कृष्णासमोर हे आव्हान!

'मन झालं बाजींद' या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं की कृष्णाला शॉक लागून ती शुद्ध हरपते. राया तिला हॉस्पिटलला घेऊन जातो पण रायाला डॉक्टर सांगतात, कृष्णा वाचण्याची शक्यता कमी आहे. रायाला हे ऐकून धक्का बसतो.

राया कृष्णाला वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न सुरू करतो. कृष्णाचा जीव वाचतो पण शरीराला जबरदस्त शॉक बसल्याने तिचा उजवा हात निकामी होतो. उजव्या हाताच्या संवेदनाच निघून जातात. त्यामुळे कृष्णाला सीएची परीक्षा देता येणार नाही असा पेच निर्माण होतो. पण राया कृष्णाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो. या सर्व घटनांनंतर कृष्णा आणि राया यांचा लग्नानंतरचा पहिला मकरसंक्रातीचा सण येणार आहे. कृष्णाच्या हाताला संवेदना नसल्यामुळे कृष्णाची पतंग उडवण्याची इच्छा पूर्ण होणार का? कृष्णाला हळदीकुकूं समारंभात भाग घेता येणार का? कृष्णासमोरच्या या आव्हानाला ती कशी सामोरी जाणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.