आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन स्पेशल एपिसोड:‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत अनोखं रक्षाबंधन, कीर्तीचा भाऊ सागर बांधणार कीर्तीला राखी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेतला हा प्रसंग नव्या बदलाची नांदी आहे असं म्हटलं तरी चालेल.

बहीण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाने आपलं रक्षण करावं म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. स्टार प्रवाहच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत देखील रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र इथे कीर्तीने आपल्या भावाला राखी बांधण्याऐवजी तिच्या भावाने तिला राखी बांधलीय.

कीर्तीचं शौर्य आणि तिच्या धाडसाच्या बऱ्याच गोष्टी आपण मालिकेतून पहात आलोय. नुकतंच तिने आपल्या कुटुंबाला एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यातून वाचवत कौतुकाची थाप मिळवली. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी कीर्तीचा भाऊ सागर तिला राखी बांधून फक्त कुटुंबाचच नाही तर देशाचं रक्षण करण्यासाठी प्रेरणा देतो.

मालिकेतला हा प्रसंग नव्या बदलाची नांदी आहे असं म्हटलं तरी चालेल. कीर्तीने आयपीएस ऑफिसर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. कीर्तीच्या या स्वप्नपूर्तीमध्ये तिला शुभमची कशी साथ मिळणार याची देखील उत्सुकता आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचे यापुढील भाग अधिकाधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...