आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटा पडदा:ज्योतिबाला कसा मिळाला उन्मेष अश्व?, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतून उलगडणार उन्मेष अश्वाची कथा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशाल निकमने या मालिकेसाठी घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं आहे.

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. ज्योतिबाच्या अवताराची गोष्ट या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. लवकरच मालिकेत ज्योतिबाच्या उन्मेष अश्वाची गोष्टही पाहायला मिळणार आहे. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार असणाऱ्या ज्योतिबाच्या कथा आपण वाचल्या आहेत. पण हा घोडा सफेद रंगाचा का? ज्योतिबाला हा घोडा कुणी भेट दिला? यामागची कथा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतून उलगडणार आहे.

ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने या मालिकेसाठी घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं आहे. मालिकेतला हा खास प्रसंग साकारण्यासाठी सेटवर कोहिनूर नावाच्या घोड्याची खास एंट्री झाली आहे. नावाप्रमाणेच हा घोडा कोहिनूर असल्याचं विशालने सांगितलं. या खास दोस्तासोबत माझी मैत्री झाली आहे. माझ्याकडून घोडेस्वारी करताना थोडी जरी चूक झाली तरी कोहिनूर मला सांभाळून घेतो. मी सेटवर आल्यावर पहिली कोणाची भेट घेत असेन तर तो आहे कोहिनूर. त्याला खाऊ घालणं त्याच्याशी गप्पा मारणं ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे. ज्योतिबाची भूमिका साकारण्यासाठी कोहिनूरचाही खूप मोलाचा वाटा आहे.

बातम्या आणखी आहेत...