आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेस कोठारेंचे छोट्या पडद्यावर कमबॅक:तब्बल 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय उर्मिला कोठारे, ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये साकारतेय 'ही' भूमिका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’

मोठ्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री उर्मिला कोठारे आता छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. स्टार प्रवाहवर नव्याने दाखल होत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून उर्मिला तब्बल 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

वैदेही असं उर्मिलाच्या पात्राचे नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, ‘खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय."

पुढे ती सांगते, "सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका मी आवर्जून पहाते. नायिका म्हणून या प्रवाहात आता मी देखील सामील होणार आहे त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे."

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका येत्या 2 मे पासून रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...