आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भेटली ती पुन्हा'चा सिक्वेल:वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत पुन्हा एकत्र, 'भेटली ती पुन्हा 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

"भेटली तू पुन्हा" या चित्रपटाचा "भेटली ती पुन्हा 2" हा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट 28 जुलै 2017 ला प्रदर्शित होता. आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे . त्यामुळे अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

देवी सातेरी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप स्टुडिओज याचित्रपटाची निर्मिती करणार असून गिरीश परब, आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर "भेटली ती पुन्हा 2" या सिक्वेलद्वारे आजवर अनेक मालिकांचे दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत. "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट लिहिणारे संजय जमखंडी "भेटली ती पुन्हा 2" चे लेखन करत आहेत.

अतिशय हलकीफुलकी कथा, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा नैसर्गिक अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू, "हरवू जरा....", "जानू जानू...." अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ "भेटली तू पुन्हा" या चित्रपटात झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. आता सिक्वेल होताना चित्रपटाच्या कथेने काय वळण घेतले आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...