आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्टार प्रवाहवरीन वैजू नंबर वन मालिकेच्या सेटवर बाप्पाचं थाटामाटात आगमन झालं आहे. तिसरी मंझिल चाळीत अगदी वर्गणी गोळा करण्यापासून ते बाप्पाची मूर्ती बनवेपर्यंत सगळं काही उत्साहात पार पडलं आहे. बाप्पाची मूर्ती पर्यावरणपूरक असून चाळीमध्ये एक कृत्रिम तलाव बनवण्यात आला आहे. या तलावात बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे.
भल्यामोठ्या टॉवरच्या गर्दीत चाळसंस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. त्यामुळे वैजू नंबर वन मालिकेतला गणपती उत्साह चाळीतल्या धमाल दिवसांची आठवण नक्कीच करुन देईल.
तर
मालिकेच्या सेटवरही जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं आहे. जोशपूर्ण वातावरणात बाप्पाची आरतीही करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.