आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळदीच्या रंगात रंगले वनिता खरात-सुमित लोंढे:स्वतःच्या हळदीत केला बेभान डान्स, आज चढणार बोहल्यावर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली वनिता खरात ही बॉयफ्रेंड सुमित लोढेंसह आज (2 फ्रेब्रुवारी) विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वनिताने तिच्या मेंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आज तिला आणि सुमितला हळद लागली. दोघेही हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले.

वनिताचा एक हळद समारंभातील फोटो समोर आला आहे. ज्यात ती बेभान होऊन डान्स करताना दिसली. वनिताने स्वत: अद्याप हळदीचे फोटो शेअर केले नसले तरी तिच्या मित्र-मैत्रिणींनी इन्स्टाग्राम पोस्ट आणि स्टोरीमध्ये या सोहळ्याचे फोटो शेअर केलेत. अशाच एका इन्स्टाग्राम प्रोफाइलवर वनिताचा बेभान नाचनाताचा फोटो शेअर करण्यात आलाय, शिवाय तिचे काही व्हिडिओही समोर आलेत.

हळदीसाठी वनिता आणि सुमितने खास पांढऱ्या रंगाचा फुलांची डिझाइन असलेला पेहराव केला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांनीही वनिता व सुमितच्या हळदीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली.

वनिताचा होणारा नवरा सुमित एक एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. वनिताने सुमितच्या वाढदिवशी फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.

प्राजक्ता माळीने भेट दिले वनिताला खास दागिने
दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने वनिताला तिच्या लग्नाच्या निमित्ताने खास दागिने भेट म्हणून दिले आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड सुरु केला. ‘प्राजक्तराज’मधील सोनसळा या प्रकारातील दागिन्यांचे संपूर्ण कलेक्शन प्राजक्ताने वनिताला भेट म्हणून दिले आहे. त्यावेळी तिने तोडे, बेलपानटीक, वर्जटीक असे विविध दागिने दिले आहेत. विशेष म्हणजे वनितालाही तिने दिलेले हे दागिने फार आवडले आहेत.

आज वनिता आणि सुमित साताजन्माच्या गाठीत अडकणार आहेत. चाहते दोघांना वर-वधूच्या रुपात बघण्यास आतुर आहेत.

बातम्या आणखी आहेत...