आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताजन्माच्या गाठीत अडकले वनिता-सुमीत:लग्नात वनिताचा भन्नाट उखाणा, ‘दिलबरो’ गाणे लागताच डोळ्यात तरळले पाणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री वनिता खरात 2 फेब्रुवारी रोजी सुमीत लोंढेसोबत साताजन्माच्या गाठीत अडकली. गेल्या अनेक दिवसांपासून वनिताच्या लग्नाची चर्चा सुरू होती. गुरुवारी थाटामाटात दोघांचे लग्न पार पडले.

दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत. या नवदाम्पत्यावर शुभेच्छा सेलिब्रिटी तसेच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज आणि पैठणी शेला असा मराठमोळा लूक केला होता. पारंपरिक दागिन्यांनी तिने आपला हा लूक पूर्ण केला. तर सुमीतने शेरवानी आणि फेटा बांधत शाही लूक केला होता.

लग्नाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी वनिताने भन्नाट उखाणा घेतला. तिच्या उखाण्याला उपस्थितांनी दाद दिली. "टेंशन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा... सुमीत तुच माझा महाराष्ट्र तुच माझी हास्यजत्रा..." असा उखाणा घेताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

लग्नानंतर दोघांचे रिसेप्शन पार पडले. यावेळी वनिताने डियायनर साडी तर सुमीतने ब्लेझर घातला होता.

यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांनी ‘बनो रे बनो मेरी चली ससुराल’, ‘नवराई माझी लाडाची’ आणि ‘मुड़ के ना देखो दिलबरो’ या गाण्यांवर डान्स केला. याचे व्हिडिओही त्यांनी शेअर केले आहेत. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या कलाकारांचा हा डान्स पाहून वनिताच्या डोळ्यात पाणी आले. यावेळी ती रडतानाही पाहायला मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून वनिता आणि सुमीत यांच्या प्रीवेडिंग शूटमधील फोटो आणि लग्नापूर्वींच्या विधींचे फोटो व्हायरल झालो होते. तिच्या मेंदीच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतल्यानंतर हळदीच फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले होते.

अशी जुळली रेशीमगाठ
वनिताच्या नवऱ्याविषयी सांगायचे झाले तर तो एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. वनिताने काही महिन्यांपूर्वी खास फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. एका मुलाखतीमध्ये सुमीत-वनिता यांनी त्यांची हटके लव्ह स्टोरी सांगितली. चक्क लुडो खेळता खेळता या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. वनिता-सुमितने सांगितल्याप्रमाणे ते दोघे आधीपासून मित्र होते.

बातम्या आणखी आहेत...