आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी वेड या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. शिवाय त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हीदेखील या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतेय. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची खास झलकही यात पाहायला मिळणारेय.
रितेश आणि सलमानवर या चित्रपटातील 'वेड लावलंय' हे गाणे चित्रीत करण्यात आले असून ते आज रिलीज करण्यात आले. गाण्यात सलमानचा स्वॅग लक्ष वेधून घेतोय. रितेश आणि सलमानची जुगलबंदी प्रेक्षकांना भावणारी आहे. विशाल ददलानी आणि अजय गोगावले यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे.
पाहा गाण्याचा व्हिडिओ...
यापूर्वी 17 डिसेंबर रोजी रितेशच्या वाढदिवशी सलमानने या गाण्याचा टिझर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला होता. भाऊचा बर्थडे आहे, गिफ्ट तो बनता है.. असे हटके कॅप्शन सलमानने व्हिडिओ दिले होते. तर 19 डिसेंबरला रितेशने याच गाण्याचा टिझर शेअर करत 'भाऊ सोबत केलेला वेडेपणा घेऊन येतोय उद्या!' असे सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगितले होते.
'वेड' या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह रितेशने यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. रितेशसह जिनिलीया देशमुख, अशोक सराफ, जिया शंकर, विद्याधर जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत. येत्या 30 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.