आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारितेश देशमुख आणि जिनिलीया या जोडीच्या बहुप्रतिक्षित 'वेड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये रितेश आणि जिनिलीया पती-पत्नीच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते अशोक सराफ यांनी रितेशच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पतीवर एकतर्फी प्रेम असलेल्या पत्नीच्या भूमिकेत जिनिलीया दिसतेय. प्रेम, इमोशन्सचा तडका या ट्रेलरमध्ये आहे.
अलीकडेच चित्रपटाचा टिझर आणि दोन गाणी रिलीज करण्यात आली होती. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलर बघता चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटातून जिनिलीया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. तर रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अभिनेत्री जिया शंकरचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 30 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
रितेशने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया अकाऊंटवर ‘वेड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. दिवाळी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर हे पोस्टर रिलीज करताना फार आनंद होत असल्याचे रितेशने या पोस्टमध्ये लिहिले होते. पाहा ट्रेलर...
'वेड' या चित्रपटाशी संबंधित बातम्या वाचा...
अभिनेता रितेश देशमुख 20 वर्षांच्या अभिनयातील कारकिर्दीनंतर आता दिग्दर्शकीय पदार्पण करतोय. त्याने दिग्दर्शित केलेला 'वेड' हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून मंगळवारी चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. 'वेड तुझा...' हे बोल असलेल्या गाण्यात रितेशचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेतोय. रितेशसोबत आणखी एका चेह-याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे जिया शंकर. 'वेड तुझा...' या गाण्यातील जियासोबतची रितेशची केमिस्ट्री छान जुळून आली आहे. अजय-अतुल यांचे संगीत असणाऱ्या या गाण्याला काही तासांतच मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस हे गाणे उतरले आहे. जाणून घ्या या अभिनेत्रीविषयी...
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. IMDB या साईटवर मोस्ट अँटीसिपेटेड फिल्म म्हणून पहिल्या क्रमांकावर हा चित्रपट ट्रेंड होत आहे. नुकतेच या चित्रपटातील पहिले गीत 'वेड तुझा' प्रदर्शित झाले होते. त्या गाण्याला अल्पावधित प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 'वेड'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील 'बेसुरी' हे गाणे आज प्रदर्शित केले आहे. हे गाणे वसुंधरा. वी यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने देश म्यूजिकलेबल द्वारे हे गाणे रिलीज केले आहे. बघा व्हिडिओ...
प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखच्या बहुचर्चित 'वेड' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटातून रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. टिझरमध्ये रितेश आणि जिनिलीया लक्ष वेधून घेत आहेत. बघा टिझर...
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ 4 जून रोजी 75 वर्षांचे होत आहेत, त्यांचा आगामी चित्रपट 'वेड' आता 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला. वाचा मुलाखत..
20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबई फिल्म कंपनीने आज सहाव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. 'वेड' असे या चित्रपटाचे नाव असून तब्बल दहा वर्षांनंतर जिनिलिया मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. जिनिलियाने चित्रपटाच्या मुहूर्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. वाचा सविस्तर...
छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. टीआरपीच्या यादीतही ही मालिका पहिल्या पाचमध्ये असते. मालिकेतील दीपा आणि कार्तिकची जोडीही प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या मालिकेत ते दोघे वेगळे राहत असल्याचे चित्र आहे. आता मालिकेत एका खास व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. या खास पाहुणीचे नाव आहे जिनिलीया देशमुख. कार्तिक आणि दीपा यांच्यातील दुरावा मिटवण्यासाठी जिनिलीयाची 'रंग माझा वेगळा' मालिकेत धमाकेदार एन्ट्री होणार आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.