आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहे 'सावित्री'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री:खासगी आयुष्यात विवाहित आहे वेदांगी, जाणून घ्या हिच्याविषयी A to Z

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झी मराठी वाहिनीवर 12 जून पासून संध्याकाळी 7 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट लवकरच प्रेक्षकांना सत्यवान सावित्री या मालिकेत बघायला मिळणार आहे. पतीवरील असिम प्रेमामुळे यमदेवांशी कुशलतेने संवाद साधण्याचं धैर्य सावित्रीच्या ठायी आलं. तिच्यातील कलागुणांनी तिला सामान्यातून असामान्य घडवलं. तिची ही प्रेरणादायी गोष्ट तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने झी मराठी वाहिनीने ही कथा दैनंदिन मालिकेतून सादर करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.

या मालिकेचे प्रोमोज नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. या मालिकेत सावित्रीची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना होती, त्याच उत्तर देखील प्रेक्षकांना नुकतंच वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या प्रोमोज मधून मिळालं आहे.

या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी ही सावित्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत सावित्रीची बालपणापासूनची कथा दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत बालपणीच्या सावित्रीची भूमिका राधा धरणे साकारणार आहे.

तर वेदांगी या मालिकेत तरुणपणीच्या सावित्रीची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसेल.

कोण आहे वेदांगी?

वेदांगी मूळची मुंबईची आहे.

डहाणूकर कॉलेज आणि डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे.

वेदांगीने या आधी अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या असून ती एक नृत्यांगना देखील आहे. 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमामधून वेदांगी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

झी युवा वरील ‘सूर राहू दे’ ही मालिका, 'लंडनच्या आजीबाई', 'मऊ', 'छडा', 'लौट आओ गौरी', 'बिलिव्ह इन'सारख्या नाटक तसेच वेब सिरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मुंबईत वेदांगी व्हिक्टोरियस डान्स अकॅडमी चालवत असून यामधून तिने अनेकांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.

वेदांगीचे मागील वर्षीच लग्न झाले आहे.

वेदांगी आणि अभिषेक तिळगुळकर यांनी नोव्हेंबर 2021 साली राजेशाही थाटात लग्न केले आहे.

अभिषेक हा पेट्रोलियम इंजिनिअर असून ऑस्ट्रेलियातुन त्याने एमबीएच शिक्षण घेतले आहे.

या मालिकेबद्दल बोलताना वेदांगी म्हणाली, "ही मालिका म्हणजे गोष्ट आहे यमाकडून सत्यवानाचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची आणि ती प्रमुख भूमिका माझ्या वाट्याला आली याचा मला खूप आनंद आहे. सावित्रीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पण तिचा जीवनप्रवास नाही माहिती. ही मालिका खूपच भव्य दिव्य रूपात तिचा जीवन प्रवास प्रेक्षकांना दाखवेल. प्रेक्षकांना ही कथा पाहायला खूप आवडेल याची मला खात्री आहे."

बातम्या आणखी आहेत...