आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटातून गच्छंती:टीकेनंतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या बाहेर? चर्चांना उधाण

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची काही महिन्यांपूर्वीच घोषणा झाली. या चित्रपटातून बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार मराठी पडद्यावर पाऊल टाकतोय. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्याचा लूकदेखील समोर आला होता.

चित्रपटात हार्दिक जोशी, विशाल निकम, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, प्रवीण तरडे हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकरदेखील चित्रपटातील लूक रिव्हील करण्यात आला होता. पण आता या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. महेश मांजरेकर यांनी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा रंगली आहे.

टीकेनंतर महेश मांजरेकरांचा निर्णय
खरं तर चित्रपटातील सर्व कलाकारांचा लूक समोर आल्यानंतर शिवप्रेमींनी सत्या मांजरेकरच्या निवडीवर आक्षेप नोंदवला होता. त्याच्यावर सडकून टीका झाली होती. सत्या मांजरेकर छत्रपतींचा मावळा म्हणून शोभत नाही त्याला ही भूमिका देऊ नये, अशा शब्दांत अनेकांनी टीका केली होती. या विरोधामुळे महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलाला या भूमिकेतून काढून टाकल्याचे बोलले जात आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
नुकताच या चित्रपटातील सर्व कलाकार जिममध्ये वर्कआउट करताना दिसले. अभिनेता आरोह वेलणकर त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने ‘टीम वर्क’ असे म्हणत सर्व कलाकारांचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर केला.

यात सत्या मांजरेकर हा कुठेच दिसला नाही. दुसरीकडे आरोह या चित्रपटाच्या टीमसोबत जीम करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून सत्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्याच्याऐवजी आरोह वेलणकरची वर्णी चित्रपटात लागली असा अंदाज वर्तवला जातोय. आता यात किती तथ्य आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...