आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नव्वदच्या दशकामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस कलाकारांमध्ये गणती होणारे जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर(68) यांचे आज (8 ऑक्टोबर) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ठाण्यातील राहत्या घरी निधन झाले.
एक चार्मिंग अभिनेता अशी ओळख असलेले अविनाश खर्चीकर यांनी नाटकांतून अभिनयाची सुरुवात केली. सौजन्याची एैशीतैशी, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन, वासुची सासू, तुज आहे तुजपाशी अशा गाजलेल्या नाटकात त्यांनी अभिनय केला. त्यानंतर 1978 मध्ये त्यांनी चित्रपसृष्टीत पदार्पण केले. यात जशास तसे, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, चालू नवरा भोळी बायको, असा अनेक चित्रपटात अविनाश यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.