आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता काळाच्या पडद्याआड:ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी कोविड सेंटरमध्ये घेतला अखेरचा श्वास

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील काही काळापासून ते आजारी होते.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मंगळवारी दुपारी ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किशोर यांचा नातू आशीषने एका न्यूज वेबसाइटशी बोलताना वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

14 एप्रिलपासून होते रुग्णालयात दाखल
आशीषने सांगितले, 'माझ्या आजोबांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते 14 एप्रिलपासून ठाण्यातील कोविड 19 सेंटरमध्ये दाखल होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली होती. अखेर त्यांनी 20 एप्रिल रोजी दुपारी 12:30 ते 1:00 च्या दरम्यान कोविड सेंटरमध्ये अखेरचा श्वास घेतला.'

किशोर नांदलस्कर यांनी सुमारे 40 नाटके, 25 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि 20 हून अधिक मालिकांमधून काम केले आहे.त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

किशोर नांदलस्कर यांचा अल्पपरिचय
किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली हे आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. मुंबईतील लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. न्यू इरा हायस्कूल आणि युनियन हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले होते.

किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्यांच्या वडिलांनी त्याकाळी नाटकांमधून स्त्री भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे घरातच अभिनयाचे संस्कार किशोर यांच्यावर झाले. 60 च्या सुमारास रंगभूमीवर सादर झालेल्या ‘आमराई’ या नाटकात किशोर नांदलस्कर यांनी पहिल्यांदा अभिनय केला. दरम्यान त्यांनी एका कंपनीत काही वर्षे नोकरीदेखील केली. नोकरी करत त्यांनी आपली आवडही जोपासली. 80 च्या दशकात त्यांनी दुरदर्शनवर गजरा, नाटक आणि अन्य कार्यक्रमांमधून आपला सहभाग नोंदवला.

‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘नाना करते प्यार’ ही त्यांची नावाजलेली नाटकं आहेत. तर महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांमधून नांदलस्कर प्रेक्षकांच्या भेटीला आले.

मागील काही वर्षांपासून होते आजारी
किशोर नांदलस्कर गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांना हृदयविकार, मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. ‘पेसमेकर’ बसवला गेला होता. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी काम करणे कमी केले होते.

लग्झरी आयुष्य जगणे पसंत करायचे किशोर
किशोर नांदलस्कर लग्झरी आयुष्य जगणे पसंत करत होते. वृत्तानुसार, मुंबईत त्यांचे तीन बंगले आहेत. यापैकी एका बंगल्यात त्यांचे कुटुंब वास्तव्याला आहे. तर इतर दोन बंगले भाड्याने दिले आहेत. त्यांच्या लग्झरी कार कलेक्शनमध्ये फॉर्च्युनर आणि इनोव्हा या गाड्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...