आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अलार्म काका' काळाच्या पडद्याआड:ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी मालवली प्राणज्योत; मोती साबणाच्या जाहिरातीमधील 'अलार्म काका' म्हणून होते प्रसिद्ध

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी मनोरंजन विश्वामध्ये करमरकर आबा म्हणून ते ओळखले जायचे.

मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. परंतु ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते लोकप्रिय होते. मुंबईतील विलेपार्ले येथे ते वास्तव्याला होते.

अनेक हिंदी चित्रपटांमध्ये केला होता अभिनय
विद्याधर करमरकर यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला होता. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटांत ते झळकले होते. अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केले. त्यासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

अनेक जाहिराती गाजल्या
चित्रपटच नव्हे तर करमरकर यांनी अनेक जाहिरातींमध्येही काम केले. इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केले आहे. मोती साबणाच्या जाहिरातीतील त्यांनी साकारलेली ‘अलार्म काकां’ची भूमिका बरीच गाजली होती.

बातम्या आणखी आहेत...