आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:'लागिर झालं जी' मालिकेत 'जिजी' हे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय मराठी मालिका 'लागिर झालं जी'मध्ये जिजी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या 74 वर्षांच्या होत्या. मराठी मनोरंजन सृष्टीत ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका अशी ओळख असलेल्या कमल ठोके यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमल ठोके गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. बंगळुरू इथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 14 नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरू इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कलम यांच्यावर त्यांच्या कराड इथल्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. झी मराठी या चॅनेलवरील मालिका लागिर झालं जी मधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख मिळवली होती. कमल ठोके यांनी बाबा लगीन, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, ना. मुख्यमंत्री गावडे अशा अनेक मराठी सिनेमांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली.