आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर काळाच्या पडद्याआड:प्रदीर्घ आजाराने वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 मुंबईतल्या राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. तसेच त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ते ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले.

मोहनदास सुखटणकर यांच्याविषयी...

मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्यात नामांकित डॉक्टर होते. मोहनदास सुखटणकर यांचे बालपण गोव्यात गेले. त्यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गोव्यातील माशेल आणि म्हापसा येथे झाले.

रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, दुर्गा, स्पर्श, आभाळाचे रंग आणि मस्त्यगंधा या नाटकांमध्ये त्यांमी काम केलं. नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही काम केले आहे.

त्याबरोबरच ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले. तसेच ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिकेतही ते झळकले होते. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...