आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:‘नाट्यसंपदा’च्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचे निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या त्या पत्नी होत्या.

‘नाट्यसंपदा’ नाट्यसंस्थेच्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाले आहे. वृद्धपकाळाने 4 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 85 वर्षांच्या होत्या.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या त्या पत्नी होत्या.विजया पणशीकर यांनी ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या पश्च्यात मुलगा, मुलगी, सून आणि नातवंड असा परिवार आहे. विजया पणशीकर यांचे माहेरचे आडनाव कुलकर्णी होते.

1963 साली प्रभाकर पणशीकर यांनी नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेची स्थापना केली होती. या संस्थेने ’अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके रंगमंचावर आणली त्यानंतर ’मला काही सांगायचंय’, ’इथे ओशाळला मृत्यू’, ’कट्यार काळजात घुसली’ अशी अनेक नाटकं गाजली.

बातम्या आणखी आहेत...