आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा मराठी चित्रपट:'मंगलाष्टक रिटर्न'मध्ये झळकणार वृषभ शहा आणि शीतल अहिरराव यांची जोडी, चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टी चित्रपटगृह हाऊसफुल करण्यासाठी सज्ज झाली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या कथा, सादरीकरण यासह आता सिनेमात कलाकारांच्या नव्या फ्रेश जोड्या आणण्याकडेही सिनेमाकर्त्यांचा कल आहे. नवीन जोड्यांचा हा ट्रेंड सुरू असताना लवकरच अभिनेता वृषभ शहा आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांच्या नव्या जोडीची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच एकत्र काम करत असलेल्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री निर्माता वीरकुमार शहा आणि 'शारदा प्रॉडक्शन' या प्रॉडक्शन हाऊसतर्फे प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक योगेश भोसले यांनी सांभाळली आहे.

अभिनेत्री शीतल अहिरराव आणि अभिनेता वृषभ शाह 'मंगलाष्टक रिटर्न' या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. कलाकार म्हणून अंगी असलेल्या मनोरंजन क्षेत्रातल्या या नव्या उभारत्या ताऱ्यांच्या कलेला साऱ्याच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. सातत्याने नवे कोरे आणि चौकटी बाहेरचे विषय असलेले चित्रपट स्वीकारणारी शीतल आणि दमदार भूमिका स्वीकारत नवकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला वृषभ शहा या चित्रपटातून आपली कला नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर उमटवतील यांत शंकाच नाही.

विशेष म्हणजे 'घटस्फोट लग्नसोहळा' ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट याच 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटातील आहे, नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून थिएटर चालू होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावात अटी शर्थीचे पालन करत आणि कलाकारांच्या मदतीने या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्णत्वास आले आहे. चित्रपटाचे विषयघन आणि गमतीदार नावासह आणि चित्रपटातील कलाकारांबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांनाही आतुरता लागून राहिली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, आनंद इंगळे, प्रसन्न केतकर, कमलेश सावंत, भक्ती चव्हाण हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...