आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटेस्ट ट्रॅक:शर्वरी आणि जान्हवीच्या नव्या आयुष्याला होणार सुरुवात... 'बायको अशी हव्वी' आणि 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत विवाह विशेष सप्ताह

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बायको अशी हव्वी' रात्री 8.30 आणि 'शुभमंगल ऑनलाईन' ही मालिका रात्री 10.00 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. नव्या आयुष्याची सुरुवात. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आपल्या कुटुंबाला मागे सोडून नवर्‍याच्या घरी मुलगी जाते ती फक्त आपल्या जोडीवर असलेल्या विश्वास आणि प्रेमाखतर... लग्नानंतर मुलीचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते... कलर्स मराठीवरील 'बायको अशी हव्वी' आणि 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकांमध्ये येत्या आठवड्यात जान्हवी–विभास आणि शंतनू–शर्वरी यांचा लग्नसोहळा बघायला मिळणार आहे.

'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेमध्ये शंतनू आणि शर्वरी अखेर लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. यांचा विवाह सोहळा आनंदात पार पडणार आहे. दोघांचे लग्न पारंपारिक पध्दतीने पार पडणार असून प्रत्येक विधिला साजेसा असा उखाणा देखील घेणार आहेत. सप्तपदी जरा विशेष असणार आहे, कारण शंतनू शर्वरीला उचलून फेरे पूर्ण करणार आहे.

सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख, हिरव्या रंगाची साडी, हिरवा चुडा, मंगळसूत्र या लूकमध्ये शर्वरी खूप सुंदर दिसत आहे. आता खर्‍या अर्थाने शंतनूला शर्वरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे.

'बायको अशी हव्वी' मालिकेमध्ये विभास राजेशिर्के आणि जान्हवी सातारकर यांचे लग्न अतिशय साध्या पध्दतीने पार पडणार आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळी, रांगडा बाज दिसून येणार आहे. जान्हवी पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे. पण, विभासचे सत्य अजून जान्हवीसमोर आले नाहीये. त्याने लपवलेले हे सत्य तिच्यासमोर कधी आणि कसे येईल ? राजेशिर्के कुटुंबात जान्हवी कशी रमेल ? विभासचं खरं रूप तिच्यासमोर येईल ? हे बघणे रंजक असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...