आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अजूनही बरसात आहे':आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का?, इंट्रेस्टिंग वळणावर मालिका

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का?

प्रेमाला कुठे असते Expiry Date? असं म्हणत बऱ्याच वर्षांनी उमेश कामत आणि मुक्ता बर्वे हे कलाकार सोनी मराठी वाहिनीवरील 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले. मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढून, मालिकेच्या शीर्षकगीताची कॅलिग्राफी केलेली छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे.

मीरा आणि आदिराज यांची भेट होईल की नाही, अशी परिस्थिती असताना 10 वर्षांनी आदिराज आणि मीरा पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत, आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम वर्तमानावर होईल का? हे सगळं पुढे उलगडत जाणार आहे.

आदिराज आणि मीरा अजूनही अविवाहित आहेत आणि मीराच्या आयुष्यात तिचा एक मित्रही आहे. आता आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? आदिराज आणि मीरा यांचं नातं कोणतं वळण घेईल? हे मालिकेच्या येणा-या भागांत बघणे इंट्रेस्टिंग असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...