आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विस्ट अँड टर्न:संजीवनी करणार रणजीतला अटक? कसं दूर करतील राजा रानी हे नवं संकट !

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राजा रानीची गं जोडी' मालिकेला नवीन वळण

'राजा रानीची गं जोडी' मालिकेत संजीवनीच्या आयुष्यातील संकट काही कमी होण्याचं नावं घेत नाही. आता इतक्या महिन्यानंतर कुठे दोघांच्या वाट्याला सुखाचे, आनंदाचे क्षण येऊ लागले होते, पण तेदेखील त्यांच्या नशिबी नाही की काय असं वाटू लागले आहे. दादासाहेंबांनी संजीवनी – रणजीतविरुध्द रचलेल्या नव्या कटामुळे एक नवं संकट येऊन उभं राहिले आहे. यामुळे दोघाच्या संसारात कुठलं मोठ वादळ येणार आहे हे प्रेक्षकांना या आठवड्यात कळणार आहे.

संजीवनी रणजीतला अटक करण्यासाठी घरी येणार आहे, तिच्यासाठी हे आयुष्यातील सगळ्यात मोठं आव्हानं असणार यात शंका नाही. पण ते म्हणतात ना, जेव्हा नाती घट्ट होऊ पहातात तेव्हाचं त्यांची कसोटी लागते हे अगदी खरे आहे. PSI संजीवनी की ढालेपाटील यांची सून, रणजीतची बायको संजीवनी यामध्ये संजीवनीची मोठी कसोटी लागणार आहे.

दादासाहेब, राजश्री वाहिनी आणि अपर्णा यांनी रचलेल्या कटामध्ये रणजीत आता पुर्णपणे अडकला असून त्याच्या नावाचे अरेस्ट वॉरंट निघते आणि त्याला अटक करण्याची जबाबदारी संजीवनीवर सोपण्यात येते. आता हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे की, संजीवनी रणजीतला अटक करणार ? पुढे काय घडणार ? या मोठ्या संकटाला राजाच्या साथीने राणी कशी मात देईल ? संजीवनी आणि रणजीत या संकटाला कसे सामोरे जातील हे मालिकेच्या येणा-या भागांत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...