आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मानाच्या समजल्या जाणाऱ्या यंदाच्या 33 व्या टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'कारखानिसांची वारी' (Ashes On A Road Trip) या मराठी चित्रपटाची निवड वर्ल्ड प्रीमिअरसाठी निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव 31 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत टोकियो येथे रंगणार आहे.
नाईन आर्चर्स पिक्चर्स कंपनी आणि प्रवाह निर्मिती यांनी "कारखानिसांची वारी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश जोशी यांनी केले आहे तर अर्चना बोऱ्हाडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून छायांकनाची ही जवाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी याआधी "लेथ जोशी" या अनेक महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
या चित्रपटात अभिनेता अमेय वाघ, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, अजित अभ्यंकर, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले आणि प्रदीप वेलणकर या नावाजलेल्या कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे संगीत 'ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे आहे व पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी यांचे आहे.
हा चित्रपट एका प्रवासावर आधारित आहे. ज्यात एका कुटुंबाचा प्रवास विनोदी अंगाने दाखवण्यात आला आहे. भाषेच्या संस्कृतीच्या सीमा पार करून आपला मराठी सिनेमा जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशा चित्रपटांच्या मागे मराठी प्रेक्षकांनी उभे राहिले पाहिजे असे दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.