आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'येऊ कशी तशी मी नांदायला'चा लेटेस्ट ट्रॅक:मोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली, मालविकाचा होणार संताप!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा होतोय.

एका गोड नात्याची कथा सांगणारी 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. रसिक प्रेक्षकांनी मालिकेला आणि त्यातील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडली आहे.

मोहित आणि त्याच्या आईकडून पदोपदी अपमान होऊनसुद्धा मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा होतोय, किंबहुना नलू मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ नये म्हणून प्रयत्न करतायेत.

अखेर तो दिवस येतो आणि साखरपुड्याच्या दिवशी मोहितला आणि त्याच्या आईला जाणवत की, स्वीटूचं लक्ष या सोहोळ्यात नसून ती वेगळ्याच विचारात आहे. ओम आणि स्वीटूमध्ये काहीतरी सुरु आहे. हे कुठेतरी मोहित आणि त्याच्या आईला पचनी पडत नाही, म्हणून ते दोघेही स्वीटूवर नको नको ते आरोप करतात. या सगळ्यात ओम मध्ये पडून स्वीटू कशी निर्दोष आहे हे पटवून देतो आणि पुन्हा एकदा आपलं स्वीटूवर प्रेम असल्याची कबुली देतो.

या प्रेमाच्या कबुलीनंतर मालविकाचा प्रचंड संताप होतो. या सर्व घडामोडीनंतर आता काय असेल मालविकाची पुढची खेळी? स्वीटूचा सगळ्यांसमोर झालेल्या अपमानानंतर साळवी कुटुंब विशेषतः नलू मावशी या प्रेमाला होकार देतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...