आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही लोकप्रिय मालिका आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या सुरुवातीपासूनच पसंतीस पडली आहेत. यातील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे 'मोमो'. या मालिकेत ‘मोमो’ ही विनोदी भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचं प्रेक्षक चाहत्यांकडून कौतुक झालं. या भूमिकेनं तिला ओळख मिळवून दिली. याच निमित्ताने तिच्या सोबत साधलेला हा खास संवाद
हे खरं आहे. सहकलाकारांशी बोलताना अगदी माझ्या पालकांशी बोलतानाही मी मोमो बोलते तसेच उच्चार करते तसं बोलायची सवयच झाली आहे. घरी गेल्यावरही तसं बोलले की, भूमिकेतून बाहेर ये गं, असं सगळे सांगतात. ही भूमिका चाहत्यांना आवडतेय हे कळलं, की भूमिका साकारायला आणखी मजा येते. ऑडिशन दिलं तेव्हा अमेरिका रिटर्न मुलगी एवढीच तिची ओळख होती. हळूहळू ती भूमिका फुलत गेली.
मी तिच्याएवढा मेकअप कधीच करत नाही आणि तशी अजिबातच नाही, त्यामुळे ही भूमिका साकारणं हे आव्हान होतं.
मालिकेचा पहिला दिवस होता आणि माझं चित्रीकरण शुभांगी गोखले आणि अदिती सारंगधर या कसलेल्या कलाकारांसोबत होतं. भीती वाटली. त्यांनी खूप धीर देत समजून घेतलं. तिथं अदिती माझी एवढी काळजी घेत होती, की मला आईची आठवण यायची. मी तिच्याजवळ रडायचेही. मालिका असो किंवा वैयक्तिक काही सांगणं, तिनं खूप समजून घेतलं. तिचा सल्ला नेहमीच माझ्यासाठी मोलाचा आहे. शुभांगीताई समोर आल्यावरही मला आईची आठवण येते.
घरापासून दूर असताना आम्ही हॉटेल रूममध्येच किचन तयार केलं होतं. अदितीचं चित्रीकरण सुरू असेल, तेव्हा मी जेवण तयार करायची आणि एरवी ती करायची.
तशी मी खूप उत्साही आहे. मुंबईत गेली चार वर्षं एकटी राहत आहे. तिथं सरावण्यासाठी वेळ जातो. चित्रीकरणासाठी बाहेरच्या राज्यात आल्यावर आम्ही बायोबबलमध्ये काम करत आहोत. घराच्या बाहेर असणं किंवा काम झाल्यावरही घरी जायचं नाही; तर रूममध्ये जायचं, हा विचारही तणावात नेणारा होता. आधी हे प्रकरण खूप त्रासदायक वाटलं. एकमेकांना धीर देत आम्ही काम करत आहोत. कुणी पालकांपासून, तर कुणी मुलाबाळांपासून दूर आहे. इथं आल्यावर चौकटीबाहेरचं आयुष्य जगणं काय असतं, हे कळतंय. आता बाहेर प्रवास करायची नितांत गरज आहे. योग, जॉगिंग आणि योग्य आहार असं गणित आम्ही सहकलाकारांनी जमवलं आहे. अदिती आणि मी दोघीही फिटनेसप्रेमी असल्यानं ते जमून जातं.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.