आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे - वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे ‘सत्यवान आणि सावित्री’ यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांमध्ये वटपौर्णिमा या सणाचा विशेष भाग देखील पाहायला मिळेल.
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकतंच या मालिकेत यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यांचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजा मस्ती तर प्रेक्षकांनी पाहिलीच सोबत यश आणि नेहाचा लग्न सोहळा डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने संपन्न झाला.
या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात आपण नेहा आणि यश आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करताना पाहणार आहोत.
या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभुदे अशी प्रार्थना करतो.
स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे, 'स्वाभिमान' मालिकेतील पल्लवी, 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना आणि अनघा, 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अप्पू, 'मुरांबा' मालिकेतील रमा, 'पिंकीचा विजय असो' मालिकेतील पिंकी आणि 'अबोली' यंदा पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत.
या खास सणासाठी सगळ्याच नायिकांनी जय्यत तयारी केली असून या सगळ्यांचा पारंपरिक लूक लक्ष वेधणारा आहे.
पिंकी तर हटके अंदाजात वटपौर्णिमा साजरी करणार आहे. खरंतर तिने वटपौर्णिमेचं व्रत करु नये म्हणून युवराजच्या आईने खूप प्रयत्न केले आहेत. पण हार मानेल ती पिंकी कसली युवराजसकट त्याच्या गाडीलाच पिंकी फेरे मारुन व्रत पूर्ण करणार आहे.
'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपा आणि कार्तिकचं नातं निर्णायक वळणावर आहे. कार्तिकीला कार्तिकच आपले बाबा आहेत हे सत्य कळलं आहे. त्यामुळे आई बाबांनी एकत्र यावं असं तिला मनोमन वाटतंय.
आपल्या आईने बाबांसाठी वटपौर्णिमेचं व्रत करावं अशी कार्तिकीची इच्छा आहे. तर तिकडे ऐन वाटपौर्णिमेच्या दिवशी कार्तिकच्या अटकेसाठी पोलीस हजर झालेत. कार्तिकवरचं हे संकट दूर व्हावं यासाठी दीपा वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतही कीर्तीने शुभमसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं आहे. कर्तव्य आणि घरच्या जबाबदाऱ्या अशी कसोटी पार करत कीर्ती आपलं स्वप्न पूर्ण करत आहे. शुभमचा भक्कम पाठिंबा असल्यामुळेच कीर्ती आपलं ध्येय गाठू शकतेय. त्यामुळे कीर्ती-शुभमसाठी यंदाची वटपौर्णिमा खास आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील जयदीप-गौरीसाठीही वटपौर्णिमा खास ठरणार आहे. दोघांमधले गैरसमज दूर झालेत. त्यामुळे गौरीही जयदीपासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.
सहकुटुंब सहपरिवारमध्येही वटपौर्णिमेचा जल्लोष पाहायला मिळेल. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या मालिकांचे वटपौर्णिमा विशेष भाग नक्की पहा १४ जूनला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.