आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सारेगमप नॉनस्टॉप 25:‘एक देश एक राग महासोहोळा’, सारेगमप घेऊन येत आहे प्रेक्षकांसाठी सुरांची मैफल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर निभावणार आहे.

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात आकाशवाणीवरील भक्ती संगीताने तर काही जण मन:शांती अनुभवण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकतात. उपनगरी रेल्वेने किंवा ‘बेस्ट’ बसने प्रवास करणारे नोकरदार, वाहतूक कोंडीत अडकलेला प्रवासी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असतात. संगीतप्रेमी मराठीजनांसाठी 'सा रे ग म प' हा कार्यक्रम नेहमीच अग्रस्थानी राहिला असून गेली 25 वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सुरांची महफिल सादर करत आहे.

हा यशस्वी रौप्यमहोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी झी मराठी सादर करत आहे 'सारेगमप एक देश एक राग'. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर निभावणार आहे. तसेच सारेगमपच्या सेलिब्रिटी गेस्ट म्हणून ‘पल्लवी जोशी’ देखील उपस्थित असणार आहेत. या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लिटिल चॅम्प्स मधील पंचरत्न ‘कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत’ यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल.

तसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवन, रेणुका शहाणे, अमृता सुभाष, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत, सोबत स्वानंद किरकिरे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत, रवी जाधव, स्वप्नील बांदोडकर ह्या दिग्गज्यांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे, तसेच पल्लवी जोशी कमलेश भडकमकर आणि टीम सोबत सारेगमपच्या प्रवासाला उजाळा देतील.

या कॉन्सर्टमध्ये फक्त आवाजाचे सूरच नाही लागणार तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांचे आवडते विनोदवीर आणि मालिकांमधील कलाकार देखील असणार आहेत.  'सा रे ग म प एक देश एक राग’चा हा विशेष सोहळा रविवार 24 मे संध्याकाळी 7 वाजता  झी मराठीवर प्रेक्षक बघू शकतील. 

बातम्या आणखी आहेत...