आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिथे असाल तिथे हसाल म्हणते प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी छोट्या पडद्यावर दाखल झालेला फू बाई फू हा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेतोय. अवघ्या महिन्याभरातच हा शो ऑफएअर होतोय. या कार्यक्रमाचे पहिले पर्व चांगलेच गाजले होते. तब्बल 9 वर्षांनी या शोचे दुसरे पर्व भेटीला आले होते. पण अर्ध्यावरच या शोचा गाशा गुंडाळला जातोय.
काय आहे कारण?
या कार्यक्रमाचे पहिले पर्व विनोद आणि कलाकारांचा अभिनय यांच्या जोरावर अतिशय गाजले होते. त्यामुळेच निर्मात्यांनी आणि वाहिनीने या कार्यक्रमाचा पुढील सीझन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल 9 वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. कार्यक्रमात निर्मिती सावंत आणि उमेश कामत परीक्षकाच्या भूमिकेत होते तर वैदेही परशुरामी निवेदिकेच्या भूमिकेत होती. मात्र इतक्या वर्षांनी सुरू झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अनेक सीझन गाजवणाऱ्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली. या कार्यक्रमाला हवा तसा टीआरपी मिळत नसल्याने हा कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याचे बोलले जात आहे.
ओमकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पंढरीनाथ कांबळे, प्राजक्ता हनमकर, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर अशा अनेक हरहुन्नरी कलाकारांना सोबत घेऊन 'फू बाई फू' ची गाडी सुरू झाली खरी पण कार्यक्रमातील पांचट विनोद आणि घसरलेला दर्जा पाहून प्रेक्षकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे हा कार्यक्रम टीआरपी यादीत कुठेही स्थान मिळवू शकला नाही. 3 नोव्हेंबर 2022 रोजी सूरू झालेला हा कार्यक्रम आता प्रेक्षकांची रजा घेणार आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग चित्रित होत आहे.
तर दुसरीकडे झी मराठी वाहिनी दोन नवीन मालिका घेऊन येत आहे. येत्या 21 डिसेंबर पासून ‘लोकमान्य’ आणि ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.