आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौणिमा स्पेशल एपिसोड:वटपौर्णिमेच्या पूजेत आसावरी समोर येणार सोहमचं सत्य, समरने आणलेले अडथळे पार करत मानसी पूर्ण करणार व्रत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झी मराठीवरील मालिकांमध्ये वटपौणिमा विशेष!
  • होम मिनिस्टरमध्ये वहिनी साजरी करणार वटपौर्णिमा
  • माझा होशील ना मालिकेत सई आणि गुलप्रीत मामींची पहिली वटपौर्णिमा

झी मराठीवरील मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा सौभाग्यशाली सण साजरा होणार आहे. याची सुरुवात ‘होम मिनिस्टरपासून’ होणार आहे, माहेर कितीही आवडलं तरी आपण माहेरी कायम राहू शकत नाही. माहेरवाशिणीला आपली पाऊलं सासरी परत आणावीच लागतात म्हणूंनच आपला नवा सीजन आता सासरी करणार आहोत. सासर म्हणजे कर्तव्य पण या सगळ्या भावनांना मनातून कितीही वाटलं तरी कधी मोकळी वाट मिळत नाही, होम मिनिस्टरच्या नव्या सीझनमधून याच कडू गोड आठवणींची वाट मोकळी करून देणार आहे.

‘पाहिले न मी तुला’ मध्ये मानसीने वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करू नये म्हणून समर, भोपेच्या मदतीने अनेक अडथळे आणतो. परंतु हे सगळे अडथळे पार करत मानसी हे व्रत पूर्ण करते आणि समरचा डाव फसतो.

‘अग्गंबाई सुनबाई’ मध्ये वटपौर्णिमेच्या पूजेत सोहम आणि सुझॅनचं सत्य आसावरीसमोर येतं, चिडून ती शुभ्राला सांगते आजपासून तू सोहमचं नाव लावायचं नाहीस. तसंच ती शुभ्राला म्हणते की 'तुला असं का वाटलं कि मी तुझी सासू आहे, मी तुझी सासू नाही तर आई आहे, आणि तुझ्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध मी तुला नक्की न्याय मिळवून देईन.'

इकडे ‘माझा होशील ना’मध्ये सई आणि गुलप्रीत मामींची पहिली वटपौर्णिमा साजरी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...