आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटा पडद्यावर चित्रपटांची बरसात:प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत आहे 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स चित्रपट महोत्सव'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स चित्रपट महोत्सव 26 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस

मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीमध्ये विनोदी कलाकारांचे योगदान फार मोठे आहे. म्हणूनच गेली सात वर्षे झी टॉकीज सातत्याने या कलाकारांचा सन्मान करत आहे. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सतर्फे या सर्व कलाकारांच्या योगदानाबद्दल त्यांना मानाचा मुजरा केला जातो. लवकरच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्ताने झी टॉकीजने खास विनोदी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. 26 ऑक्टोबरपासून या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

या चित्रपट महोत्सवाची सुरुवात 'अशी ही बनवाबनवी' या सुपरहिट चित्रपटाने होणार आहे. गेली 32 वर्षे हा चित्रपट प्रेक्षकांना पोटधरून हसवत आहे. जेष्ठ अभिनेते दादा कोंडके यांच्या विनोदी भूमिका अजुनही अजरामर आहेत. दादांचे चित्रपट अजूनही आपण तितक्याच उत्सुकतेने बघतो. दादा कोंडकेंचा 'पळवा पळवी' 27 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सावळ्या कुंभार आणि त्याचं हुशार गाढव आपल्या सगळ्यांच्या अजुनही समरणात आहे. हे गाढव काय काय धमाल करतं हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'गाढवाचं लग्न' 28 ऑक्टोबर रोजी. प्रथमेश परब आणि ह्रितिका श्रोत्री यांचा 'टकाटक' 29 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या पुढील चित्रपट असणार आहे 'आलटून पालटून'. भाऊ कदम आणि अशोक सराफ यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'आलटून पालटून' 30 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपट महोत्सवाचा शेवट 'आम्ही सातपुते' या कॉमेडी चित्रपटाने होणार आहे. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ आणि स्वप्नील जोशी या कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट गुंफलेला आहे.