आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ट्रीट:झी टॉकीज घेऊन येत आहे चित्रपट महोत्सव; दशकातील खास 10 ब्लॉकबस्टर चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 जुलै ते 17 जुलै दरम्यान हा चित्रपट महोत्सव आहे.

झी टॉकीज वाहिनीवर मागील दशकातील खास 10 ब्लॉकबस्टर चित्रपट जुलै महिन्यात प्रसारित होणार आहेत. 6 जुलै ते 17 जुलै दरम्यान दररोज संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज हे खास चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

नाना पाटेकरांच्या अभिनयाने अजरामर झालेला ‘नटसम्राट’ 6 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. नाट्य सृष्टीतून निवृत्त झालेल्या पण नाट्य सृष्टीच्या आठवणीत रमलेल्या कलाकाराचा निवृत्तीनंतरचा दुःखद प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे. 2016 सालचा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलेला सुपरहिट चित्रपट म्हणजे सैराट. परश्या आणि आर्ची या जोडप्याला कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने किती मोठी किंमत मोजावी लागते, हे या चित्रपटाद्वारे मांडण्यात आलेलं आहे. 7 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षक बघू शकणार आहेत. 

‘एक विलक्षण प्रेमकहाणी’ म्हणून ओळखला जाणारा काकस्पर्श 8 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट सृष्टीतील समीक्षकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं होतं. सचिन खेडकर, मेधा मांजरेकर, प्रिया बापट, सविता मालपेकर, केतकी माटेगावकर या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. रंपाट हा चित्रपट 9 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मिथुन आणि मुन्नी हे दोन उदयोन्मुख कलाकार अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबई मध्ये येतात, आणि मग सुरु होतो त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ 10 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याला गुन्हेगारीचं लागलेलं ग्रहण आणि यात अडकलेली तरुणाई याचं चित्रण या चित्रपटात बघायला मिळेल.  एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या 8 वर्षांच्या चैतन्य भोवती गुंफलेला ‘नाळ’ 13 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिनेमा गृहात सलग 100 दिवस हाऊसफुल अशी पाटी झळकवणारा ‘लय भारी’ 14 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. नगरपालिकेत झाडूवाला असणारा आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी धडपडणाऱ्या बबनला एके दिवशी पैशांची खाण मिळते. यामुळे तो कसा कुटुंबापासून दुरावला जातो आणि स्वतःचा विनाश करून घेतो, याची कथा नशीबवान चित्रपटात 15 जुलै रोजी पाहायला मिळणार.

2015  साली देऊळ बंद या चित्रपटाद्वारे प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात प्रदार्पण केले. देवावर विश्वास नसणाऱ्या शास्त्रज्ञाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिका साकारत असून मोहन जोशी, दीपक करंजीकर, निवेदिता सराफ या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. 16 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या फिल्म फेस्टिवलची  सांगता 17 जुलै रोजी एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाने होणार आहे.बाबांनी दिलेली एलिझाबेथ ही सायकल ज्ञानेश आणि मुक्ता या भावंडांना काही कारणांमुळे विकावी लागते. या भावंडांची सायकल परत मिळवण्यासाठी चाललेली धडपड या चित्रपटाद्वारे रेखाटण्यात आलेली आहे. 

0