आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन ट्रीट:झी टॉकीज देणार आहे ब्लॉकबस्टर चित्रपटांची ट्रीट, प्रेक्षकांसाठी मे महिना ठरणार आहे खास 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झी टॉकीज संपूर्ण मे महिन्यामध्ये प्रेक्षकांसाठी 5 मेगा चित्रपट महोत्सव सादर करीत आहे.

मागील दशकभरात झी टॉकीज ने आपल्या प्रेक्षकांना विविध कथानक असलेल्या चित्रपटांनी  खिळवून ठेवलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनाच घरात बसावं लागत आहे. या संकटामुळेच सर्व सिनेमा हॉल  बंद आहेत. याच काळात ‘टॉकीज प्रीमियर लीग’ च्या माध्यमातून झी टॉकीज ने प्रेक्षकांच्या मनोरंजनची जबाबदारी घेतली आहे. याद्वारे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिनीवर ब्लॉकबस्टर चित्रपटांची मेजवानी  मिळणार आहे.

"छप्पर फाड फिल्म फेस्टिव्हल" या आठवड्यात दर संध्याकाळी ७ वाजता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का, काकस्पर्श, लै भारी, सैराट, मुळशी पॅटर्न या सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत.  11 ते 14 या काळात संध्याकाळी  7  वाजता  झपाटलेला, गाढवाचं लग्न, धुमधडाका, अशी हि बनवा बनवी हे सदाबहार चित्रपट प्रेक्षकांना ‘धुवाधार फिल्म फेस्टिव्हल’ च्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत.  

18 ते 23 मे  या कालावधीत ‘देवाक  काळजी चित्रपट महोत्सव’ या मध्ये हुप्पा हुय्या, देऊळ बंद, बोला अलख निरंजन या सारखे आत्म्यास जागृती देणारे भक्तिमय चित्रपट संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 25 मे ते 30 मे या आठवडा "डबल धमाकेदार" असणार आहे. "चिल्लर पार्टी " आणि "सोनेरी पान" या  फिल्म फेस्टिवल्स च्या माध्यमातून नाळ, फॅन्ड्री, धप्पा, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, नटरंग, आणि माहेरची साडी.  यासारख्या काळजाला भिडणाऱ्या आणि निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांची मेजवानी सर्व प्रेक्षकांना दर सकाळी 11 संध्याकाळी आणि 7 वाजता मिळणार आहे.

लॉकडाऊनमुळे घरी राहून संपूर्ण परिवारासोबत या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक देखील सज्ज असतील यात शंकाच नाही.

बातम्या आणखी आहेत...