आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सैफ अली खान, संजय दत्त आणि विद्या बालन अभिनित ‘परिणीता’ चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी दिव्य मराठीसोबत चित्रपटासंबंधी शेअर केलेत किस्से...
‘परिणीता'ला गुरुवारी 15 वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटावर आम्ही सर्वांनी दीर्घकाळ काम केले आहे. त्यामुळे आम्हा सर्वांमध्ये एका कुटुंबाप्रमाणे नाते निर्माण झाले होते. शेवटच्या दिवशी पॅकअप बोलण्यापूर्वीचे दोन-तीन शॉट उर्वरित होते. त्यावेळची गोष्ट आहे. मी सर्वांना म्हणालो की, जसे मी पॅकअप म्हणेन, तेव्हा सर्वजण एकसाथ गायब होऊन जायचे. सेट एकदम रिकामे व्हावे. तेव्हा सैफ पाठीमागून म्हणाला, ‘दादा, आम्ही सर्वांनी गायब का व्हावे, यापेक्षा तुम्हीच जा.‘
यापूर्वी जेव्हा आम्ही दार्जिलिंगमध्ये चित्रीकरण करत होतो तेव्हा ट्रेनच्या डब्ब्यांची निवड करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. आम्ही यार्डमध्ये उभी असलेली रेल्वे पाहायला गेलो, परंतु तेथे सर्व डबे नवीन काळातील होते. खूप शोधल्यानंतर दोन बोगी मिळाल्या, ज्या खूप खराब झाल्या होत्या. रेल्वेने सांगितले की, याची टेस्ट करण्यासाठी कमीत कमी तीन-चार महिने लागतील. आमच्याकडे काहीच मार्ग नव्हता, म्हणून आम्ही तीन ते चार महिने वाट पाहिली.
चित्रपटात असेच एक दुर्गापूजेचे दृश्य होते. जेथे संजय दत्तकडून पूजा डान्स करून घ्यायचा होता. आम्ही त्याला सांगितले की, धूपदाणी हातात आणि दातांमध्ये अडकवून डान्स करायचा आहे. हे ऐकून संजय म्हणाला,‘अरे दादा, जीव घेता का? कुठे दुखापत झाली तर काय होईल.’ मी खूप प्रयत्न केला तरीदेखील तो नाही म्हणाला. शेवटी सेटवरून निघताना अचानक संजयने विचारले, हा शॉट छोटे नबाबने (सैफ अली खान) केला का? मी म्हणालो नाही. संजू म्हणाला, मग तर मी करणारच आणि संजयचा तो डान्स प्रसिद्ध झाला.
चित्रपटात विद्या बालनचे 13-14 टेस्ट घेतल्यानंतर विधू विनोद चाेपडा (निर्माता) यांनी तिला फायनल केले होते. मला म्हणाले, विद्याला मला भेटायला बोलव. येथे तिचे आयुष्य घडणार आहे. तिला बोलव, ती येईलच. विद्या भेटायला आली आणि चोपडा साहेब तिला म्हणाले की, तू चित्रपटाचे चित्रीकरण सुरू कर. दादा तुझे दिग्दर्शक आहेत. नंतर चोपडा साहेब मला जादूची झप्पी देऊन म्हणाले, जर विद्या आली नसती तर कदाचित हा चित्रपटच झाला नसता. चित्रपटात संजयला घेणे सर्वांत सोपे राहिले. विधूंनी संजयला फोन केला आणि म्हणाले, बाबा, एक चित्रपट करायचा आहे. त्याने भूमिका काय आहे हे न ऐकताच होकार दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.