आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:‘अवतार 2’च्या 50 टक्के भागाचे चित्रीकरण पाण्याखाली झाले, यात 3250 व्हीएफएक्स शॉट्स दिसतील : जेम्स

अमित कर्ण। मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरव्ह्यू ‘अवतार 2’च्या 50 टक्के भागाचे चित्रीकरण पाण्याखाली झाले, यात 3250 व्हीएफएक्स शॉट्स दिसतील : जेम्स

तु पको तुम्हाला कोणत्या बाबी, घटनाक्रम आणि पैलूंमध्ये महान कथा मिळतात? बातम्या असो की प्रवास किंवा आणखी काही असेल त्यातून मला कथा मिळतात. अन्य चित्रपटही पाहतो. मी अनेक दशके वर्षावनामध्ये (रेनफॉरेस्ट) राहिलो आहे. डायव्हिंगसाठी मी ५२ वर्षे दिली आहेत. सध्या मी ६८ वर्षांचा आहे. १६ वर्षांचा होतो त्यावेळेसपासून डायव्हिंग शिकत आहे. चित्रपटाच्या ५० टक्के भागाचे चित्रीकरण पाण्याखाली झाले आहे. माझे मन आणि आत्मा समुद्रात वसतात. या सर्व बाबींतून मला माझ्या कथा मिळतात.

तुमच्या चित्रपटात कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे? चित्रीकरण मोठ्या प्रमाणात पाण्याखाली झाले आहे. पाण्याखाली चित्रीकरणासाठी खूप साऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. तथापि, दुसरा पैलू असा की आमच्या कलाकारांनाच ते तंत्रज्ञान माहीत नसते. येथे आमची पात्रं अशी आहेत जी हवेतून श्वास घेतात जसे डॉल्फीन असतात. तशा प्रजाती काही प्रमाणात जमिनीवर तर खूप मोठ्या प्रमाणात पाण्यात राहतात. आमच्या अभिनेत्यांना ‘फ्री डायव्हिंग’ शिकावी लागली. आम्हाला जगभरातून उत्कृष्ट असे फ्री डायव्हिंग प्रशिक्षक मिळाले. मी स्वत: गेल्या ५० वर्षांपासून फ्री डायव्हर आहे. आमची अभिनेत्री केट विंसलेट माझ्यापेक्षा जास्त वेळ पाण्यात श्वास रोखून धरू शकते.

तुम्ही इतक्या दीर्घ काळापासून एकाच प्रकल्पावर का काम करत आहात? असे नाही की या चित्रपटात फक्त एकच पैलू आहे. ‘अवतार’ एक संपूर्ण जग आहे. यात खूप पात्रं आहेत. हजारो, लाखो प्राणी आणि वेगळे पर्यावरणही आहे. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने मी या सर्व बाबींवर मी सर्जनशीलतेने सातत्याने काम करत होतो. लाइव्ह अॅक्शन चित्रीकरणासाठी तेवढा पूर्ण वेळ कामात होतो. मी पूर्णपणे यात गुंतलो आहे. एक मोठा भाग समुद्री संरक्षणासाठीही समर्पित आहे. तर त्या पाच वर्षांत मी पाच ते सहा माहितीपट तयार केले. यादरम्यान निश्चितपणे माझे पूर्ण समर्पण एक बिग स्क्रीन चित्रपट बनवण्यासाठी होते. लोक ज्यावेळी हा चित्रपट आणि त्यातील सर्जनशीलता पाहतील, त्यावेळी त्यांना माझे पाच वर्षांचे कष्ट दिसेल.

भारतीय पौराणिक कथांमधून कोणते भाग तुम्ही घेतले आहेत? भारतीय संस्कृतीने निश्चितपणे माणुसकीच्या विचारांची पायाभरणी केली आहे. येथूनच निश्चित होते की जगाच्या विचारांची दिशा काय असणार आहे. तर माझे जे जग आहे ‘अवतार’चे, त्यासाठी भारताकडूनही प्रेरणा मिळाली आहे. जो पैलू आम्हाला यात दाखवायचा आहे, तो फक्त एक घटनाक्रम नाही. आचरणाची एक आवश्यक बाब आहे. हे एक मंत्रासारखे आहे की, आम्ही कशाप्रकारे श्वास रोखून पाण्यात प्रवेश करतो? मग कधीपर्यंत श्वास रोखून धरतो आणि शेवटी कोणत्या तालाची निर्मिती होते. म्हणून ‘द वे ऑफ वॉटर’ची ना सुरुवात आहे ना अंत. आमच्या चित्रपटात समुद्राचेही एक पात्र आहे. त्याची मजबूत बॅक स्टोरी आम्ही दाखवली आहे. ‘अवतार ३’ मध्ये पुढे अग्नीची चर्चा करणार आहोत.

दिग्दर्शक म्हणून तुम्हाला कोणत्या ताणतणावातून जावे लागले? एक दिग्दर्शक चित्रपटाच्या विचारावर चित्रपट पूर्ण होईपर्यंत कसा ठाम राहतो, हे सर्वात महत्त्वाचे असते. एखाद्या चित्रपटावर पाच वर्षांपर्यंत काम करताना त्याची कल्पना, कथानक, घटनाक्रमावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहणे हे एक मोठे आव्हान आहे. आणखी एक दबाव असाही असतो की दिग्दर्शकाचा चित्रपट ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावा. तथापि हा एक असा चित्रपट होता, जो लवकरात लवकर बनू शकत नव्हता. या चित्रपटात ३२५० व्हीएफएक्स शॉट्स होते, तर टर्मिनेटर २ मध्ये केवळ ४२ व्हीएफएक्स शॉट्स होते. बजेट आणि डेडलाइनचा दबाव तर होताच.

बातम्या आणखी आहेत...