आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • A Unique Journey Of The Stubbornness Of Education Veena Jamkar On The Small Screen From 'Chhotya Biochi Motthi Swapnam'!

शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास:छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’मधून वीणा जामकर छोट्या पडद्यावर!

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस असे म्हणत “छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर सुरू झाली आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या अभिनयातून कायमच वेगळेपण दाखवणारी अभिनेत्री वीणा जामकर आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

“छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत ती एका आगळ्यावेगळ्या अंदाजात दिसणार आहे. तिच्या भूमिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तिचा गावाकडचा साधाभोळा पेहेराव प्रेक्षकांना विशेष भावतोय. कोकणातल्या नयनरम्य वातावरणात या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे. याविषयी वीणा म्हणाली, “छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही माझी पहिली टेलिव्हिजन मालिका आहे. निर्माते संतोष भरत कनिकर यांनी मला दर्जेदार मालिकेची ऑफर दिली. ही मालिका लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडेल, अशी मला अपेक्षा आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या या मालिकेतून माझा टेलिव्हिजनवरचा प्रवास सुरू होतो आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. पहिलीच मालिका असल्याने मी खरंच खूप उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...