आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी चित्रपट:‘आशिकी 3’ पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये फ्लोअरवर जाईल, 2026 पर्यंत ‘भूलभुलैया 3’ ही प्रदर्शित होणार

अमित कर्ण|मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ‘भूलभुलैया 2’ चा तिसरा भाग 2026 मध्ये येईल. निर्माता भूषण कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे. यासोबतच भूषण ‘दृश्यम’ चित्रपटाचेही सहनिर्माता आहेत. याचाही तिसरा भाग पुढील दोन वर्षांत येईल, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाची मल्याळी आवृत्तीही दोन वर्षांत येणार आहे. तथापि, तिसऱ्या भागाचा हिंदी चित्रपचटीही त्याचवेळी येणार आहे. राहिला प्रश्न कार्तिकसोबतचा आणखी एक चित्रपट ‘आशिकी 3’ चा, तर तो पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

भूषण यांनी सांगितले, ‘मोहित सुरी याच्या दिग्दर्शनात ही फ्रँचायझी निश्चितपणे यशस्वी ठरली आहे. तथापि, याचा पुडील भाग अनुराग बसू आणत आहेत. याला प्रीतम संगीत देत आहेत. याला म्युझिकल बनवण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे दिग्दर्शन आणि संगीतात काही बदल झाले आहेत. कार्तिकच्या चित्रपटांच्या यशात संगीताचा महत्वाचा वाटा राहिला आहे. जाणकारांनुसार, ‘चित्रपटात अभिनयासह संगीतही उत्कृष्ट असावे, याबाबत कार्तिक सजग असतो. थ्रिलर चित्रपट ‘फ्रेडी’मध्येही त्याचे पात्र सिरियल किलर असल्याची संशय आहे, असे असतानाही हा चित्रपट म्युझिकल ठेवण्यात आला आहे. या चित्रपटातील संगीतांची जबाबदारी प्रीतम दा यांना देण्यात आली असून, त्यांच्यासोबत गीतकार इर्शाद कामिलही आहेत.’

‘भूलभुलैया 3’ साठी लागतील आणखी 3-4 वर्षे, ‘सर्कस’कडूनही आहेत मोठ्या अपेक्षा
भूषण कुमार यांना आपल्या बॅनरखाली तयार होत एसलेल्या आणि आगामी प्रकल्पांबाबतही विशेष चर्चा केली. यासोबतच त्यांनी अन्य बॅनरच्या ‘सर्कस’बाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते सांगतात, ‘दृश्यम 2’ च्या यशाने चिपटटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. आता रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ चित्रपट येत आहे. हा चित्रपट निखळ मनोरंजन करणारा आहे. यापासूनही चित्रपट उद्योगाला मोठ्या अपेक्षा आहेत. राहिला प्रश्न ‘भूल भुलैय्या 3’ चा तर त्याला थोडा वेळ तर द्यावा लागेल, किमान तीन ते चार वर्षे. आमचे लक्ष्य 2026 चे आहे. आता त्याचे यश साजरे करत आहोत.’

ठरलेल्या वेळेवरच येईल ‘आदिपुरुष’
भूषण कुमार यांनी आपला आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’चीही खास माहिती दिली. पुढील वर्षी 16 जून रोजी हा चित्रपट निश्चितपणे प्रदर्शित होईल, असा दावा त्यांनी केला. आम्ही चित्रपटाचे री-शूट करत नाही. ज्या दृश्यांवर आक्षेप आले त्यात बदल करत आहोत. ही कामे पुढील वर्षी जूनच्या खूप आधी पूर्ण होतील. त्यामुळे चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होईल.’ आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट ‘शहजादा’कडूनही भूषण यांना मोठ्या अपेक्षा आहेत. ते पुढे सांगतात, ‘कार्तिक एक उत्कृष्ट अभिनेता आहे. चित्रपटाचा पहिला लूक चाहत्यांसाठी एक नजराणा आहे. तो आपल्या भूमिकेत पूर्णपणे रमल्याचे दिसत आहे. हा अॅक्शन चित्रपट असून, पुडील वर्षी 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.’

बातम्या आणखी आहेत...