आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजय देवगण तमिळ चित्रपट ‘कॅथी’च्या हिंदी रिमेकवर काम करत आहे. याला ‘भोला’ असे नाव देण्यात आले आहे. अजय स्वत: दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात अजयसोबत तब्बू दिसणार आहे. आता अशी चर्चा सुरू आहे की या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनने अजयसोबत हातमिळवणी केली आहे. तो कॅमियोच्या भूमिकेत दिसू शकतो. वृत्तांनुसार, अभिषेक या चित्रपटात पाहुणा कलाकार असेल. तो नकारात्मक भूमिकेत दिसेल, असे सांगितले जात आहे. तथापि, यासंदर्भात निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सेटवरून अभिषेकची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ३० मार्च रोजी प्रदर्शित होईल. वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर अभिषेक लवकरच ‘के.डी.’ या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसेल. यात त्याचा एक अनोखा अवतार पाहायला मिळेल. निखिल अडवाणी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मधुमिता सुंदररमण दिग्दर्शन करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.