आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्याचे निधन:बंदिश बँडिटसह शोर इन द सिटी सारख्या चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाटक, बॉलिवूड आणि टीव्हीसह वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता अमित मिस्त्रीचे निधन झाले. मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. इंडियन फिल्म टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिलने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावरून जारी केली. "टॅलेंटेड अभिनेता अमित मिस्त्रीच्या निधनाची धक्कादायक आणि दुखद माहिती मिळाली आहे. त्यांच्या परिवाराला संवेदना, भगवान त्यांच्या आत्म्याला शांती देवो." असे पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.

अभिनेता अमित मिस्त्रीने 'क्या कहना' (2000), 'एक चालीस की लास्ट लोकल' (2007), 'शोर इन द सिटी' (2010), 'यमला पगला दीवाना' (2011), 'गली गली चोर है' (2012) आणि 'अ जेंटलमैन' (2017) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच, 'सात फेरों की हेराफेरी', 'दफा 420', 'तेनाली रामा' आणि 'मॅडम सर' अशा टीव्ही सीरियल्समध्ये सुद्धा अभिनय केले होते. गतवर्षी आलेल्या वेब सीरीज 'बंदिश बँडिट्स' मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.

मनोरंजन जगतातून शोक
अमितच्या निधनावर चित्रपट आणि टीव्हीसह मनोरंजन जगतातील कलाकारांनी शोक व्यक्त केला. विनोदी कलाकार आणि अभिनेते वीर दासने आपण लवकरच त्याच्यासोबत शूट करणार होतो असे लिहिले. तर इतर कलाकारांनी सुद्धा त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...