आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्शन ड्रामा:‘फायटर’ चित्रपटात दिसणार अभिनेता करणसिंह ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाचे शूटिंग आसाममध्ये सुरू आहे. या दरम्यान या चित्रपटाविषयी आणखी एक माहिती समोर आली. आता या चित्रपटात करण सिंह ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांची एंट्री होणार आहे. मारफ्लिक्स पिक्चरने करण आणि अक्षयचे चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिग्दर्शक आणि निर्माते सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत ते दोघे दिसत आहेत. करण आणि अक्षय यांनीदेखील हा फोटो आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यावरुन दोघेही ‘फायटर’ चित्रपटात दिसणार असल्याची खात्री होते. सध्यातरी चित्रपटात करण आणि अक्षय यांची भूमिका नेमकी कोणती असणार आहे, याची माहिती समोर आली नाही. चित्रपटात हृतिक रोशनची भूमिका एका एअर फोर्स ऑफिसरची आहे. तर अनिल कपूरही या चित्रपटात दिसणार.

बातम्या आणखी आहेत...