आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुंगातून बाहेर येताच कुटुंबीयांना मिठी मारून रडला शीझान:70 दिवस होता तुरुंगात; 25 डिसेंबर 2022 रोजी झाली होती अटक

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शीझान खानला जामीन मिळाला आहे. बहिणी फलक नाज आणि शफाक नाझ त्याला घेण्यासाठी वसई कोर्टात पोहोचल्या होत्या. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर शीझान त्यांना मिठी मारून रडताना दिसला. जवळपास 70 दिवस कारागृहात राहिल्यानंतर 4 मार्च रोजी शीझानला वसई न्यायालयातून जामीन मिळाला.

शीझान दोन महिने तुरुंगात होता
शीझान खानला 25 डिसेंबर 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. 13 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत वसई न्यायालयाने शीझानचा जामीन अर्ज फेटाळला होता.

यानंतर शीझानने उच्च न्यायालयात धाव घेतली. 17 फेब्रुवारीला हायकोर्टातूनही शीझानला दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वालीव पोलिसांनी 500 पानी आरोपपत्र दाखल केले होते.

तुनिषाची सेटवर गळफास लावून आत्महत्या
टीव्ही अभिनेत्री तुनिषाने 24 डिसेंबर रोजी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर काही तासांनंतर तिच्या आईच्या तक्रारीवरून तिचा सहकलाकार शीझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली.

तुनिषाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीझानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शीझानआणि तुनिषा जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. तुनिषाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते.

तुनिषाच्या आईचा दावा - सेटवर ड्रग्ज घ्यायचा शिझान

तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझान सेटवर ड्रग्ज घ्यायचा. इतकेच नाही तर शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषावर धर्मांतरासाठी आणि बुरखा घालण्यासाठी दबाव टाकला होता, शिझान तुनिषाचा मानसिक छळ करायचा असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत शिझानवर हे आरोप केले आहेत. येथे वाचा संपुर्ण बातमी.

शीझानची बहीण फलक नाज आणि तुनिषाचे नाते होते घट्ट:अंत्यसंस्काराच्या वेळी रडताना दिसली, तीन आठवड्यांपूर्वी तुनिषाने म्हटले होते- माझी आवडती व्यक्ती!

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा सहकलाकार शीझान अहमदला अटक केली आहे. तुनिषाच्या आईने शीझान हा मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. मंगळवारी तुनिषाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एक फोटो समोर आला आहे. या फोटोत आरोपी शीझानची बहीण स्मशानभूमीत रडताना दिसत आहे. वाचा सविस्तर...

गळफास घेण्याआधी शिझानशी बोलली होती तुनिषा:शिझानने सिक्रेट गर्लफ्रेंडसोबतचे चॅट डिलीट केले, तीही टीव्ही अभिनेता - पोलिसांची माहिती

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माचे गळफास घेण्याआधी शिझान खानसोबत बोलणे झाले होते. तसेच आरोपी शिझान हा तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...