आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीगल ड्रामा:अभिनेता सूर्याच्या ‘जय भीम’चा सिक्वेल येणार, निर्मात्यांची घाेषणा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाला लाेकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच चित्रपटाचे सह-निर्माते राजशेखर पांडियनने त्याच्या सिक्वलची घोषणा केली आहे. हा चित्रपट गोव्यात आयोजित आयएफएफआय-२०२२मध्ये दाखवण्यात आला. यावेळी चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिक्वेलवर चर्चा केली. ते म्हणाले, “जय भीम’ चित्रपटाचा सिक्वेल नक्कीच आणि लवकरच येईल. आम्ही सिक्वेलची योजना आखत आहोत, यावर कामदेखील सुरू केले आहे. आम्ही आधी सूर्याला चित्रपटाच्या निर्मिती मदत करण्यासाठी संपर्क केला होता. मात्र त्यांना कथा इतकी आवडली की, त्यांनी यात अभिनय करण्याचे सांगितले आहे. सूर्याचे २डी एंटरटेनमेंट नावाचे प्रॉडक्शन हाऊस आहे, त्याच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला होता. राजशेखर त्यांच्या निर्मिती संस्थेचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर दाखवलेला हा पहिला तमिळ चित्रपट आहे. ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ७० कोटींची कमाई केली होती.

बातम्या आणखी आहेत...