आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली:'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगवेळी हृदयाचे ठोके वाढले, हैदराबादच्या खासगी रुग्णालयात उपचार

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील अवघ्या तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रकृती नुकतीच अचानक बिघडली. त्यानंतर तिला तत्काळ हैदराबाद स्थित एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंबंधीच्या वृत्तानुसार, दीपिका रामोजी फिल्मसिटीमध्ये तिच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाची शूटिंग करत होती. त्यावेळी तिच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिला अस्वस्थ वाटत होते.

हार्ट रेट स्टेबल झाल्यानंतर सेटवर परतली

वृत्तानुसार, दीपिकाची तब्येत बिघडल्यानंतर तिला कामिनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यानंतर हार्ट रेट स्थिर झाल्यानंतर ती पुन्हा चित्रपटाच्या सेटवर परतली. दीपिका व तिच्या टीमकडून या वृत्ताची अद्याप पुष्टी झाली नाही. या चित्रपटासाठी दीपिकासोबत अमिताभ बच्चन देखील शूटिंग करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरुपौर्णिमेला चित्रपटाचे शूटिंग सुरू

'प्रोजेक्ट के'मध्ये दीपिका पदुकोणसोबत साऊथचा सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तिचा प्रभाससोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. नाग अश्विन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चालू वर्षाच्या सुरुवातीला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते.

प्रभासने सेटवरील एक फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांना ‘भारतीय सिनेमाचे गुरु’ ही पदवी दिली होती. त्याने यासंबंधीच्या एका फोटोला "या गुरुपौर्णिमेला भारतीय चित्रपटसृष्टीच्या गुरूसाठी क्लॅप करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हे आता सुरू होत आहे -Project K," असे कॅप्शन दिले होते.

बातम्या आणखी आहेत...