आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृश्यम फिल्म्सद्वारा निर्मित:‘सिया’ चित्रपटाच्या तयारीसाठी अत्याचार पीडितांना भेटली अभिनेत्री पूजा पांडे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनीष मुंद्रा यांचे दिग्दर्शन असलेला ‘सिया’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. विनीतकुमार सिंह आणि पूजा पांडे मुख्य भूमिकांमध्ये आहेत. लैंगिक अत्याचार झालेल्या एका तरुणीची ही कथा आहे. ती न्यायासाठी आवाज उठवते तेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या भूमिकेत जीव ओतण्यासाठी चित्रीकरणाच्या आधी पूजेने असे हाल भोगलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींची भेट घेतली. या पीडितांशी भेटीबाबत पूजाने सांगितले, की ‘त्याचा त्रास, संघर्ष आणि प्रवास समजून घेण्यासाठी त्यांना भेटणे आणि त्यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण करणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. त्यांना भेटल्यानंतर माझ्या लक्षात आले की त्या रियल फायटर आहेत. त्यांच्या धाडसाने मला माझी भूमिका चांगल्या प्रकारे वठवण्यात मदत मिळाली. त्यांनी त्यांची आपबिती एेकवल्यानंतर मी स्तब्ध झाले, मला रडू कोसळले.’ हा चित्रपट १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...